माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती विकसित केली आणि अलगदपणे जैविक साखळीच्या बाहेर पडला. मग शेतीसाठी सुरू झाली जमीन आणि पाण्याची वाढीव गरज. जैविक साखळीतून बाहेर पडल्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा संख्या वेगाने वाढत गेली. पुढे अमर्याद गरजा वाढत गेल्या. माणूस जसजसा पृथ्वीवर वाढत गेला तसतसे वनाच्छादित जमीन कमी होत गेली. माणूस जैविक साखळीतून बाहेर पडण्याआधी ९०%हून अधिक असलेलं जंगल आता केवळ ३१% राहिलं आहे.
या सगळ्याचे दुष्परिणाम आपण अवर्षण, अतिवृष्टी, तापमानवाढ, असमान पर्जन्यमान असं बघत आहोत. यावर जो काही एकमेव उपाय आहे तो म्हणजे पुन्हा एकदा झाडांची संख्या वाढली पाहिजे. ती नुसती वाढून चालणार नाही तर ती त्या त्या प्रदेशातील जे देशी वृक्ष आहेत ते वाढले पाहिजेत. त्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती प्रयत्न करत आहेत. त्यातून महाराष्ट्र सरकार सारखे एका वर्षी तेरा कोटी झाडं लावणं असेल, कर्नाटकातील झाडांची आई थिम्मक्का असेल, आसामातील जादव पयेंग असेल. हे सर्व आपापल्या क्षमतेला ताणून वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.
असाच एक प्रयत्न अकिरा मियावाकी यांनीही केला आहे. १९९३ मध्ये त्यांनी नैसर्गिक वननिर्मिती पद्धत विकसित केली. त्यातून प्रभावित होऊन भारतातील एक अभियंता शुभेन्दू शर्मा याने टोयोटामधील नोकरी सोडून afforestt नावाची कंपनी सुरू केली आणि त्याद्वारे तो मोकळ्या जागेत जुन्या जंगलांप्रमाणे जंगल बनवून देतो. हेही एक प्रकारे निसर्ग संवर्धनच आहे. शुभेन्दू ते स्वतः करताना कमर्शियली करतो एवढेच. पण मियावाकी अथवा शुभेन्दूने ही पद्धत लपवलेली नाही. कुणालाही सहजपणे कमीतकमी एक गुंठा जागेत या पद्धतीने जंगल तयार करता येईल.
आपल्याकडे साधारण ८०-९० च्या दशकात सामाजिक वनीकरण राबवल्या गेलं. त्यात सरसकट सगळीकडे सुबाभूळ हा परदेशी वृक्ष आणून लावला गेला. वेगात वाढ असल्याने ते वनीकरण छान असा सर्वांचा समज झाला. त्यापाठोपाठ अनेक विदेशी वृक्ष भारतात आले आणि येथील मूळ देशी झाडांवर त्यांचे अतिक्रमण झाले. निलगिरीमुळे तर कित्येक भाग ओसाड बनत गेले. औरंगाबाद येथील जेएनइसीच्या मागे निलगिरी लावल्यानंतर १० वर्षात तेथील नैसर्गिक तलाव कामातून गेल्याचं मी पाहिलंय.
दुसऱ्या बाजूला फळबाग लागवड सुद्धा बरीच झाली. यात देशी झाडेही लावली गेली. मुळात फळबाग लागवड ही वृक्षारोपण या सदरात धरायला नको. कारण एकाच प्रकारचे वृक्ष सलग लावले तर ते वन होत नाही. यात सेल्फ हीलिंग हा प्रकार नसतो. फळबागेला सतत पाणी देणे, झाडांची छाटणी, फवारणी - भलेही मग ती गोमूत्राची असेल - करावी लागते, खत द्यावं लागतं.
आपण कधी ट्रेकला जंगलात गेलो तर तिथे कुणी खत-फवारणी-छाटणी करत नसतं. तरीही तिथल्या झाडांना कीड लागली तर आपोआप जाते, फळं जास्त चवीची असतात, वाढ छान झालेली असते. हे कसं होतं? याचं शास्त्र - शोधलं नाही म्हणणार - पण वाचलं, समजून घेतलं ते मियावाकी यांनी. जंगलात वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतात. वृक्ष, वेली, पसरट-उंच, मध्यम आकाराचे, झुडूप, फक्त पावसाळी, परोपजीवी असे अनेक प्रकारचे. ते एकमेकांच्या बाजूला, जवळ वाढतात आणि एकमेकांना मदत करतात. त्यावर प्राणी पक्षी येतात - ते सुद्धा झाडांना मदत करतात. उदाहरणार्थ - तांबट आणि सुतार पक्षी हे झाडाला जर खोड अळी लागली असेल तर बरोब्बर ते ठिकाण शोधून, तिथे भोक पाडून त्यातून अळी अक्षरशः ओढून काढतात आणि खाऊन टाकतात. जंगलात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पूर्ण पोहोचत नाही तिथे जिवाणू पडलेल्या पानांचं खत करतात, जर मोठ्या काटक्या पडल्या असतील तर त्यांना जिवाणू खाऊ शकत नाही त्यावर बुरशी म्हणजे अळंबी (मशरूम) वाढतं आणि त्याचं विघटन होतं. लहान कृमी कीटक गांडूळ यात सहज वाढतात आणि झाडांना खत मिळतं. वडासारखी मोठी झाडे आपल्या पारंब्यातून जैविक उत्प्रेरक (एंझाइम) सोडतात आणि वडाखालची माती आपोआप पोषक बनते. हे परस्परावलंबन जंगलात बिनबोभाट सुरू असतं.
आता मियावाकी यांनी हीच झाडे जपान मध्ये बघितली नसतील. पण त्यांच्या निरीक्षणाचा बिंदू हाच की जंगलात - no management is best management. मग याच तत्वावर त्यांनी जंगलात झाडे जेवढी जवळ असतात तेवढीच जवळ लावली. सुरुवातीला त्यांना पाणी दिलं आणि तीन वर्षात - self sustainable - स्वसंधारणीय जंगल विकसित झालं. त्यानंतर ना तिथे पाणी घालावं लागलं ना त्याला खत फवारणी करावी लागली.
अर्थात या जंगलात जाऊन फळ तोडणं अवघड कारण एका गुंठ्यांत ३२० झाडे असतात, म्हणजे दोन झाडातील अंतर हे ३ फूट अथवा १ मीटर एवढं कमी ठेवलं जातं. याची कारणं
१. ती झाडे सोबत वाढली पाहिजेत.
२. वाढताना ती स्पर्धा करत वाढली पाहिजेत म्हणजे वेगात उंची आणि मुळांची खोली वाढते.
३. जंगल लवकर स्वावलंबी बनते.
आम्ही शुभेन्दू शर्माशी काही वेळा बोललो. शुभेन्दूचा विद्यार्थी आणि औरंगाबाद येथील सर्वात जुन्या नर्सरीचा - साकला नर्सरीचा संचालक - सागर साकलाशी सुद्धा चर्चा झाली. सागरला आम्ही एकदा प्रश्न विचारला की अशी स्पर्धा करत तर लहान झाडे पण उंच वाढतील. ती स्पर्धा थांबणार कशी? त्यावर त्याने खूप छान उत्तर दिलं - झाडांना कळतं कुठे थांबायचंय ते!
मियावाकी पद्ध्तीने जंगल लावायचं असेल तर पुढील पायऱ्या अवलंबव्यात
१. त्यातून काही उत्पन्न मिळेल ही आशा सोडून द्यावी. या जंगलातून उत्पन्न आर्थिक नाही पण शाश्वत स्वरूपाचे मिळू शकते. म्हणजे
अ. त्या भागात प्राणवायूचे प्रमाण तिप्पट होते
आ. तापमान पाच अंश सेल्सिअसने कमी होते
इ. पाऊस वाढू शकतो
ई. जमिनीची धूप शून्यावर येते
उ. पडलेला पाऊस जास्तीत जास्त जमिनीत मुरतो - कमी पावसाच्या ठिकाणी आपण १००% मुरतो असेही बघू शकतो
ऊ. स्थानिक प्राण्यांना पक्ष्यांना निवारा मिळतो - ते शेतावर कीड पडू देत नाहीत आणि उंदरांसारख्या त्रासदायक प्राण्यांवर नियंत्रण मिळवता येते
ए. मधमाश्यांसारखे कीटक वाढतात - ते परागीभवनाला मदत करतात व शेतीचे उत्पादन वाढते
ऐ. यातील माती ही जैविक विरजण (culture) म्हणून वापरता येते - एक एकरात एखादा पोतं माती युरियासारखी फेकली तर उत्पन्न हमखास वाढतं...
२. कमीतकमी एक गुंठा जागा यासाठी ठरवायची. या जागेची रुंदी कमीतकमी १० फूट असावी. जर चौरस म्हणजे ३३ X ३३ करू शकला तर उत्तम.
३. वृक्ष निवड करणे ही मोठी पायरी आहे. एका गुंठ्यांत ३२० झाडे लावताना ती स्थानिकच असावीत. किमान ४० प्रजातींची झाडे असावीत. झाडांचे चार ढोबळ प्रकार आहेत - पसरट वृक्ष, उंच वृक्ष, मध्यम वृक्ष आणि झुडूप. प्रत्येक प्रकारातील साधारण ६० ते १०० झाडे असावीत. हे करताना आपल्या भागातील साठीच्या वरच्या ज्येष्ठांची मदत घेतली तर खूप उपयोगी पडते कारण त्यांनी त्यांच्या लहानपणी ही सगळी झाडे बघितलेली असतात. महाराष्ट्रातील कमी ते मध्यम पावसाच्या भागात येणारी झाडांची यादी उद्या देईन.
४. लावणीची जागा तयार करताना आधी या एक गुंठ्यांत एक मीटर खोल खड्डा करावा. नंतर त्या मातीत ४० विटा कोकोपीट, १००० किलो तांदळाचा भुसा, २ ट्रॉली शेणखत, १ ट्रॉली गांडूळखत असं मिसळून खड्डा पुन्हा भरून घ्यावा. त्यानंतर तो किमान ४-५ दिवस तसाच पडू द्यावा. यात कोकोपीट ऐवजी गहू-ज्वारीचे धांडे बारीक करून घातले तरी चालेल. तांदळाच्या भूशाच्या ऐवजी डाळीचा भुसा वापरला तरी चालेल. जे स्थानिक उपलब्ध असेल ते वापरावे. कोणतेही रासायनिक खत घालायची आवश्यकता नाही आणि घालूही नाही.
५. निवडलेली झाडे साधारण एक ते दोन फूट उंचीची असावीत, म्हणजे सहा महिने ते एक वर्ष वयाची असावीत. झाडे लावताना एका प्रकारचे झाड त्याच प्रकारच्या झाडाजवळ लावू नये. म्हणजे पसरट झाडाजवळ दुसरे पसरट झाड नसावे, एका झुडपाच्या जवळ दुसरे झुडूप नसावे. ही झाडे एकमेकांपासून ३ फूट म्हणजे जास्तीत जास्त एक मीटर अंतरावर लावावीत.
६. लावणी झाल्यावर झाडांना आधाराला किमान ५ फूट उंच आणि २ सेंमी व्यासाचा बांबू द्यावा.
७. त्यानंतर संपूर्ण जमिनीवर ज्वारी, बाजरी, गहू - जे उपलब्ध असेल - त्या धांडाचे आच्छादन (mulching) करावे.
यानंतर आपण केवळ पाणी देत राहायचे. सुरुवातीला रोज १००० लिटर पाणी लागते. एकदा झाडे सहा महिन्यांची झाली की महिन्याला १५००० लिटर पाणी पुरते. म्हणजे १० दिवसातून एकदा ५००० लिटर. एक वर्षानंतर ही गरज अजून कमी होते आणि तीन वर्षांनंतर काहीच करावे लागत नाही. जंगल स्वतः स्वतःची काळजी घेतं आणि आपलीही!
आमचं शेत औरंगाबादपासून २५ किमी अंतरावर, बिडकीन या मोठ्या गावापासून ४ किमी अंतरावर गिधाडा शिवारात आहे. सामान्यपणे कमी ते मध्यम पाऊस पडतो.
जेव्हा आम्ही शेतात जंगल लावायचं ठरवलं तेव्हा सुरुवातीला जागा नक्की केली. शेतात सुमारे १५ गुंठे जंगल करायचं ठरवलं. पहिला टप्पा आणि प्रयोग म्हणून मागच्या वर्षी एक गुंठा जागेत जंगल लावलं.
नंतर झाडं ठरवताना आई आणि मामा यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या लहानपणी सहज दिसणारी आणि आता न दिसणारी झाडं आठवून आठवून त्यांनी सांगितली. नंतर पुण्यातील प्रांजल नर्सरीच्या जोग काकूंनी अजून झाडं सांगितली. यादी निश्चित झाली ती साकला नर्सरीच्या सागर साकलाशी बोलल्यानंतर. कारण पुढील सर्व कामं त्याच्या मार्गदर्शनाखाली होणार होती.
जंगल लावताना आधी सांगितल्या त्या सगळ्या पायऱ्या पूर्ण केल्या. त्याशिवाय काही टिपिकल भारतीय गोष्टी त्यात वाढवल्या. माझ्या वडिलांच्या दोन आत्या आहेत. दोघीही जंगल लावताना उपस्थित होत्या. त्यांच्या हातून वड लावले. मामांनी विष्णूचा अवतार म्हणजे पिंपळ, त्याची पूजा करून पिंपळ लावलं. नंतर आम्ही सर्व मित्रांनी, सागरच्या मार्गदर्शनाखाली उरलेली झाडं लावली. आच्छादन झाल्यावर झाडांना श्री सुभाष पाळेकर गुरुजींच्या पद्धतीचे अमृतपाणी दिले आणि पुढे तीन महिने, महिन्यातून एकदा अमृतपाणी देत राहिलो.
नंतर पावसाळा संपल्यापासून १५ दिवसातून एकदा आणि या महिन्यापासून १० दिवसातून एकदा ५००० लीटर पाणी देत आहोत. याशिवाय कोणतीही मशागत केली नाही. आज नऊ महिन्यानंतर सर्व झुडूप ३-४ फूट, बाकी झाडं किमान ६ फूट आणि कमाल १७ फूट एवढी झाली आहेत.
या जंगलात पक्ष्यांची संख्या वाढलीये. आमच्या भागातील वेडा राघू, पोपट, सातभाई, चिमण्या, टिटवी हे तर आहेच आणि वाढत आहेत. आता शिकारी पक्षी - ससाणा, घुबड येतील आणि कदाचित नामशेष होत आलेले गिधाडेही... आता मुंगूस सहज दिसताहेत. घोरपडी बऱ्याच प्रकारच्या या भागात आहेत, त्याही येतील कदाचित, माझ्या आजोबांनी या भागात साळिंदर पाहिलंय जे आम्हाला कधी बघायला मिळेल माहीत नाही, कदाचित या जंगलात ते येईलही... १५ गुंठ्यांत ४५०० ते ५००० झाडं लाऊन जंगल पूर्ण झालं की यातील काही गोष्टी तर नक्की होतील.
जपान मधील शेतीविषयक तत्त्वज्ञान हे भारतीय तत्त्वज्ञानाशी खूप मिळते जुळते आहे. जर फुकुओका यांचं "एका कडातून क्रांती" आणि मोहन देशपांडे यांचं "ऋषी कृषी" वाचलं तर फरक आणि साम्य दोन्हीही सहजच कळेल. बुद्ध या समान दुव्यामुळे आणि एकूणच पौर्वात्य संकृतीमुळे हे झालं असू शकतं. त्यामुळे मियावाकी पद्धतीला जराशी भारतीय फोडणी घालून आपल्यात घेऊन टाकावी.
मियावाकी यांची जशी जपानी पद्धत आहे तशाच वनीकरणाच्या काही भारतीय पद्धतीही आहेत. पंचवटी वन, देवराई आणि नक्षत्रवन. ज्यांना गावात एकत्रीकरण करण्यासाठी जागा करायची त्यांनी पंचवटी वन (पाच वृक्ष) तयार करावं, ज्यांना मुलांना खेळ, पांथस्थांना जागा, जरा फळबाग किंवा कृषी पर्यटनासाठी झाडं लावायची त्यांनी देवराई (साधारण दहा गुंठ्यांत ३०० ते ५०० झाडं) लावावी, ज्यांना भारतीय ज्योतिषशास्त्राची आवड असेल अशांनी नक्षत्रवन (नक्षत्र आणि राशीनुसार वृक्ष) लावावं आणि त्यांना जंगल उभं करावं वाटतं त्यांनी मियावाकी पद्धतीने जंगल उभं करावं. पण नवीन वननिर्मिती आणि संवर्धन नक्की करावं!
परिशिष्ट १
जीवामृत (अमृतपाणी)
पद्मश्री श्री सुभाष पाळेकर यांच्या संशोधनातून...
परसबागेकरिता जीवामृत बनविण्याची पद्धती -
1) 20 लीटर पाणी
2) 1 किलो देशी गार्इचे शेण
3) 250 मिली देशी गाईचे गोमूत्र
4) 250 ग्रॅम गूळ
5) 250 ग्रॅम बेसन
6) झाडाखालील मूठभर माती
हे मिश्रण काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घ्या व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवा व कपड्याने तोंड घट्ट बांधून ठेवा. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळा.
48 ते 72 तासांनी जीवामृत तयार होते.
हे तयार झालेले जीवामृत साधारणपणे 1 कप ते 1 ग्लास पर्यंत दर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी द्यावे.
जीवामृत 5 दिवसांमध्ये संपवून टाकावे. उरलेले जीवामृत माती मध्ये मिसळून टाका. कंपोस्ट करण्यासाठी किंवा झाडावर फवारणी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.
पद्मश्री श्री सुभाष पाळेकर यांच्या संशोधनातून...
परसबागेकरिता जीवामृत बनविण्याची पद्धती -
1) 20 लीटर पाणी
2) 1 किलो देशी गार्इचे शेण
3) 250 मिली देशी गाईचे गोमूत्र
4) 250 ग्रॅम गूळ
5) 250 ग्रॅम बेसन
6) झाडाखालील मूठभर माती
हे मिश्रण काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घ्या व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवा व कपड्याने तोंड घट्ट बांधून ठेवा. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळा.
48 ते 72 तासांनी जीवामृत तयार होते.
हे तयार झालेले जीवामृत साधारणपणे 1 कप ते 1 ग्लास पर्यंत दर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी द्यावे.
जीवामृत 5 दिवसांमध्ये संपवून टाकावे. उरलेले जीवामृत माती मध्ये मिसळून टाका. कंपोस्ट करण्यासाठी किंवा झाडावर फवारणी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.
परिशिष्ट २ - महाराष्ट्रात कमी ते माध्यम
पावसात लावता येण्यासारखी झाडे
अनुक्रमांक
|
प्रकार
|
Botanical name
|
मराठी नाव
|
1
|
पसरट
|
Acacia catechu
|
खैर
|
2
|
छोटे वृक्ष
|
Acacia leucophloea
|
हिवर
|
3
|
वृक्ष
|
Acacia nilotica
|
बाभूळ
|
4
|
पसरट
|
Aegle marmelos
|
बेल
|
5
|
पसरट
|
Ailanthus excelsa
|
महारुख
|
6
|
पसरट
|
Alangium salvifolium
|
अंकोळ
|
7
|
वृक्ष
|
Albizia lebbeck
|
काळा शिरीष
|
8
|
पसरट
|
Albizia procera
|
किन्हई
|
9
|
छोटे वृक्ष
|
Anogeissus latifolia
|
धावडा
|
10
|
वृक्ष
|
Azadirachta indica
|
कडूनिंब
|
11
|
वृक्ष
|
Bauhinia purpurea
|
कांचन
|
12
|
छोटे वृक्ष
|
Bauhinia racemosa
|
आपटा
|
13
|
वृक्ष
|
Boswellia serrata
|
सालई
|
14
|
छोटे वृक्ष
|
Bridelia retusa
|
आसणा
|
15
|
छोटे वृक्ष
|
Buchanania cochinchinensis
|
चारोळी
|
16
|
छोटे वृक्ष
|
Butea monosperma
|
पळस
|
17
|
वृक्ष
|
Cassia fistula
|
बहावा
|
18
|
छोटे वृक्ष
|
Cochlospermum religiosum
|
सोनसावर
|
19
|
छोटे वृक्ष
|
Cordia dichotoma
|
भोकर
|
20
|
छोटे वृक्ष
|
Dalbergia lanceolaria
|
फाशी
|
21
|
वृक्ष
|
Dalbergia latifolia
|
शिसम
|
22
|
वृक्ष
|
Dalbergia sisoo
|
शिसू
|
23
|
छोटे वृक्ष
|
Diospyros melanoxylon
|
तेंदू
|
24
|
छोटे वृक्ष
|
Dolichandrone falcata
|
मेडशिंगी
|
25
|
वृक्ष
|
Emblica officinalis
|
आवळा
|
26
|
वृक्ष
|
Erythrina suberosa
|
पांगारा
|
27
|
छोटे वृक्ष
|
Ficus amplissima
|
पिपर, पिपरी
|
28
|
छोटे वृक्ष
|
Thespesia populnea
|
भेंड
|
29
|
छोटे वृक्ष
|
Ficus microcarpa
|
नांद्रूक
|
30
|
पसरट
|
Ficus racemosa
|
उंबर
|
31
|
छोटे वृक्ष
|
Gardenia latifolia
|
घोगरा
|
32
|
झुडूप
|
Gardenia resinifera
|
डिकेमाली
|
33
|
छोटे वृक्ष
|
Garuga pinnata
|
काकड
|
34
|
वृक्ष
|
Gmelina arborea
|
शिवण
|
35
|
छोटे वृक्ष
|
Grewia tiliifolia
|
धामण
|
36
|
पसरट
|
Hardwickia binata
|
अंजन
|
37
|
छोटे वृक्ष
|
Heterophragma roxburghii
|
वारस
|
38
|
छोटे वृक्ष
|
Holarrhena pubescence
|
कुडा
|
39
|
वृक्ष
|
Holoptelea integrifolia
|
वावळ
|
40
|
झुडूप
|
Ixora parviflora
|
रायकुडा
|
41
|
वृक्ष
|
Lannea coromandelica
|
मोई
|
42
|
छोटे वृक्ष
|
Limonia acidissima
|
कवठ
|
43
|
पसरट
|
Madhuca latifolia
|
मोह
|
44
|
पसरट
|
Mangifera indica
|
आंबा
|
45
|
छोटे वृक्ष
|
Manilkara hexandra
|
खिरणी
|
46
|
पसरट
|
Mitragyna parvifolia
|
कळम
|
47
|
झुडूप
|
Morinda pubescens
|
बारतोंडी
|
48
|
छोटे वृक्ष
|
Nyctanthes arbor- tristis
|
पारिजातक
|
49
|
छोटे वृक्ष
|
Phoenix sylvestris
|
शिंदी
|
50
|
वृक्ष
|
Pongamia pinnata
|
करंज
|
51
|
वृक्ष
|
Prosopis cineraria
|
शमी
|
52
|
वृक्ष
|
Pterocarpus marsupium
|
बिजा
|
53
|
छोटे वृक्ष
|
Pterocarpus santalinus
|
रक्तचंदन
|
54
|
छोटे वृक्ष
|
Salix tetrasperma
|
वाळूंज
|
55
|
झुडूप
|
Salvadora persica
|
पीलू
|
56
|
पसरट
|
Sapindus laurifolius
|
रिठा
|
57
|
पसरट
|
Schleichera oleosa
|
कुसुंब
|
58
|
छोटे वृक्ष
|
Semecarpus anacardium
|
बिब्बा
|
59
|
पसरट
|
Soymida febrifuga
|
रोहन, रोहिला
|
60
|
छोटे वृक्ष
|
Sterculia urens
|
करू
|
61
|
वृक्ष
|
Stereospermum chelonoides
|
पाटल
|
62
|
वृक्ष
|
Syzygium cumini
|
जांभूळ
|
63
|
पसरट
|
Tamarindus indica
|
चिंच
|
64
|
वृक्ष
|
Tectona grandis
|
साग
|
65
|
वृक्ष
|
Terminalia arjuna
|
अर्जुन
|
66
|
पसरट
|
Terminalia bellirica
|
बेहेडा
|
67
|
पसरट
|
Terminalia tomentosa
|
ऐन
|
68
|
झुडूप
|
Trema orientalis
|
खरळ
|
69
|
छोटे वृक्ष
|
Wrightia tinctoria
|
काळा कुडा
|
70
|
छोटे वृक्ष
|
Ziziphus mauritiana
|
बोर
|
71
|
झुडूप
|
Capparis grandis
|
पाचुंदा
|
72
|
झुडूप
|
Carissa congesta
|
करवंद
|
73
|
झुडूप
|
Cassia auriculata
|
तरवड
|
74
|
झुडूप
|
Clerodendrum serratum
|
भारंगी
|
75
|
झुडूप
|
flueggea microcarpa
|
पांढरफळी
|
76
|
झुडूप
|
Helicteres isora
|
मुरूडशेंग
|
77
|
छोटे वृक्ष
|
Murraya koenigii
|
कढीपत्ता
|
78
|
झुडूप
|
Plumbago zeylanica
|
चित्रक
|
79
|
झुडूप
|
Vitex negundo
|
निर्गुडी
|
80
|
झुडूप
|
Woodfordia fructicosa
|
धायटी
|
81
|
वेल
|
Abrus precatorius
|
गुंज
|
82
|
वेल
|
Argyreia nervosa
|
समुद्रशोक
|
83
|
वेल
|
Asparagus racemosus
|
शतावरी
|
84
|
वेल
|
Caesalpinia bonducella
|
सागरगोटा
|
85
|
झुडूप
|
Combretum albidum
|
पिळूकी
|
86
|
झुडूप
|
Cryptolepis dubia
|
कावळी, सुपर्णिका
|
87
|
झुडूप
|
Gymnema sylvestre
|
मधुनाशिनी, बेडकी
|
88
|
वेल
|
Hemidesmus indicus var. Indicus
|
अनंतमुळ
|
89
|
बांबू
|
Bambusa arundinacea
|
कळक बांबू
|
90
|
बांबू
|
Dendrocalamus strictus
|
मेस बांबू
|
91
|
पसरट
|
Alstonia scholaris
|
सप्तपर्णी
|
92
|
पसरट
|
Anthocephalus cadamba,
Anthocephalus indicus
|
कदंब
|
93
|
पसरट
|
Ficus benghalensis
|
वड
|
94
|
पसरट
|
Ficus religiosa
|
पिंपळ
|
95
|
पसरट
|
milingtonia hortensis
|
गगनमोगरा
|
96
|
झुडूप
|
Jasminum sambac
|
मोगरा
|
97
|
झुडूप
|
Nerium oleander
|
कण्हेर
|
98
|
झुडूप
|
Calotropis Gigantea
|
रुई
|
99
|
छोटे वृक्ष
|
Sesbania grandiflora
|
हादगा
|
100
|
छोटे वृक्ष
|
Commiphora wightii
|
गुग्गुळ
|
101
|
झुडूप
|
Justicia adhatoda
|
अडुळसा
|
102
|
झुडूप
|
Lawsonia inermis
|
मेंदी
|
103
|
छोटे वृक्ष
|
Balanites roxburghii
|
हिंगणबेट
|
104
|
झुडूप
|
thevatia
|
बिट्टी
|
105
|
झुडूप
|
Tabernaemontana divaricata
|
तगर
|
106
|
छोटे वृक्ष
|
Artabotrys hexapetalus
|
हिरवा चाफा
|
107
|
छोटे वृक्ष
|
Michelia champaka
|
सोनचाफा
|
108
|
छोटे वृक्ष
|
Mimusops elengi
|
बकुळ
|
109
|
छोटे वृक्ष
|
Ficus carica
|
अंजीर
|
110
|
छोटे वृक्ष
|
Annona squamosa
|
सीताफळ
|
111
|
छोटे वृक्ष
|
Psidium guajava
|
पेरू
|
112
|
छोटे वृक्ष
|
Punica granatum
|
डाळिंब
|
113
|
छोटे वृक्ष
|
Putranjiva roxburghii
|
पुत्रवंती
|
114
|
छोटे वृक्ष
|
Saraca indica, Saraca asoca
|
सीताअशोक
|
115
|
छोटे वृक्ष
|
Thespesia populnea
|
पारस पिंपळ
|
116
|
छोटे वृक्ष
|
Moringa oleifera
|
शेवगा
|
117
|
वृक्ष
|
Cassia fistula
|
अमलताश
|
118
|
वृक्ष
|
Lagerstroemia Indica
|
तामण
|
119
|
वृक्ष
|
Albizia procera
|
पांढरा शिरीष
|
120
|
पसरट
|
Adansonia digitata
|
गोरख चिंच
|
121
|
पसरट
|
Bombax ceiba
|
काटेसावर
|
122
|
छोटे वृक्ष
|
Garcinia indica
|
कोकम
|
123
|
वृक्ष
|
Millingtonia hortensis
|
गगनमोगरा
|
124
|
छोटे वृक्ष
|
Manilkara zapota
|
चिकू
|
125
|
वृक्ष
|
Artocarpus heterophyllus
|
फणस
|
126
|
पसरट
|
Sterculia foetida
|
भारतीय बदाम
|
127
|
छोटे वृक्ष
|
Citrus limetta
|
मोसंबी
|
128
|
पसरट
|
Terminalia chebula
|
हिरडा
|
129
|
वृक्ष
|
Bauhinia racemosa
|
हिरवा आपटा
|
130
|
छोटे वृक्ष
|
Myristica fragrans
|
जायफळ
|
131
|
छोटे वृक्ष
|
Garcinia Indica
|
आमसूल
|
132
|
वृक्ष
|
Citrus × sinensis
|
संत्री
|
133
|
वृक्ष
|
Annona reticulata
|
रामफळ
|
134
|
वृक्ष
|
Annona atemoya
|
हनुमानफळ
|
135
|
वेल
|
Jasminum officinale
|
जाई
|
136
|
वेल
|
Jasminum auriculatum
|
जुई
|
137
|
वेल
|
सायली
|
|
139
|
झुडूप
|
सोनकेळ
|
|
140
|
वेल
|
Acacia concinna
|
शिकेकाई
|
141
|
वेल
|
Piper betle
|
पानवेल
|
142
|
वेल
|
Piper nigrum
|
मिरी
|
143
|
झुडूप
|
Pandanus amaryllifolius
|
केकताड
|
144
|
झुडूप
|
lantana camara
|
घाणेरी
|
145
|
पसरट
|
Haldina cordifolia
|
हळदु
|
146
|
झुडूप
|
Agave americana
|
घायपात
|
147
|
झुडूप
|
Cestrum diurnum
|
कुंती / कामिनी
|
148
|
झुडूप
|
आंबटी
|
|
149
|
छोटे वृक्ष
|
Tabebuia rosea
|
वसंत राणी
|
150
|
झुडूप
|
शेम्बडी
|
|
151
|
झुडूप
|
Ocimum sanctum
|
तुळस
|
परिशिष्ट ३ - आमच्या वनाची वाढ

Khupach chaan mahiti
ReplyDeletewaah wa. khup chhan.
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद ...
ReplyDeleteनजिकच्या भविष्यकाळात असाच काहीसा उपक्रम करण्याचा विचार आहे . त्या वेळी आपली मदत लागेलच .
धन्यवाद
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली,धन्यवाद.
ReplyDeleteखूप छान माहिती भविष्यात असे वनप्रकल्प करायचे माझे स्वप्न आहे😊
ReplyDeleteखुप छान सर . माझ्या कडेही शेती आहे . ही शेती एका नाल्या काठी आहे तेथे जर १५ गुंठे असे वन तयार करायचे आहे . जेणे करून जमीनीची धुप पुर्ण थांबेल . तरी एवढ्या रोपाची जमवाजमव व वेलीची रोपे कोठून मिळतील . याचे मार्गदर्शन मिळावे . व आताचे या वनाचे फोटो पहायला मिळाले तर फार प्रेरणादायी ठरेल . तरी रोपे कोठून मिळतील याची माहीती नक्की द्या .
ReplyDeleteदिपक पाटील जळगाव मो नं ८७६६ ४१०७ ४३
Deleteई मेलdipakpatil@gmail.com
प्रांजल नर्सरी पुणे
Deletehttps://goo.gl/maps/eas1kf3fZx3Nkniy6
साकला नर्सरी औरंगाबाद
https://goo.gl/maps/WWkwqtxochGss463A
यांच्याकडे रोपं आणि मार्गदर्शन मिळेल.
खुपच छान लिहिलं आहे.. पोटुळला आमचं छोटंसं शेत आहे तिथे आम्ही हे करू.. Thanku so much
Deleteदिपक पाटील मो क्र ८७६६४१०७४३
ReplyDeleteemail -dipakpatil2485@gmail.com
खूप छान माहिती आणि तुमचं काम पण भेट द्यायला नक्की आवडेल 👍🏼
ReplyDelete