एक नुकताच टीनएज मध्ये आलेला मुलगा असतो. खोडकर, बंडखोर. गावात पावसापाण्यासाठी दर वर्षी पूजा घातली जात असते. त्याला काही हे पटत नसतं. तो असतो गावाच्या सरपंचाचा मुलगा. एका वर्षी तो पूजा घालू देत नाही. ना पूजा, ना बळी... नेमकं त्याच वर्षी दिवाळीच्या दुसर्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात होते. लोक घाबरतात. सरपंचाला म्हणतात आपण पूजा केली नाही, म्हणून हे होतंय. दोन दिवसांत नदीला जोरात पूर येतो. आता मात्र सरपंचपण घाबरतात. पण मुलगा हट्टी असतो. तो म्हणतो, “पाऊस देव धाडत नाही, पूजेमुळे पण पडत नाही. डोंगर, झाडे, जंगले यामुळे पडतो.” वडील म्हणतात, “मग आता तो डोंगर वाचवेल का आपल्याला?” मुलगा चॅलेंज घेतो. व्रात्य असतोच त्यामुळे डोंगरवाटा, कपारी, गुहा यांची इत्यंभूत माहिती असते. तो सगळ्या गावकर्यांना, गायी-गुरांना घेऊन डोंगरातल्या मोठ्या गुहेत घेऊन जातो आणि पाऊस पूर कमी झाला की सगळे परत येतात. शेवटी गावकर्यांना मुलाचं विज्ञानवादी, तर्कशुद्ध म्हणणं पटतं.
पुढे या मुलाचा मित्र ऐन युद्धाच्या वेळी हातपाय गळतो. त्याला बरंच काही सांगून, शिकवून हा त्याला युद्ध करायला लावतो, मदत करतो. पण त्या सांगण्यात आणि आधीच्या टीनएज वाल्या मुलाच्या सांगण्यात विसंगती आहे.
अन्नापासूनि ही भूते पर्जन्यातुनि अन्न ते |
यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे || गीताई ३ – १४ ||
मग काही प्रश्न पडतात
१. आधीचा मुलगा आणि नंतरचा मोठा माणूस एकच की वेगवेगळे?
२. मोठं झाल्यावर लोकानुनयी सांगावं असं काही असतं का?
३. काहीही करून याला युद्धाला उभं करणं आवश्यक आहे. म्हणून त्याला जसं पटू शकेल तसं सांगायचं होतं का?
४. हे गीतेमध्ये नंतर कुणीतरी घातले का?
५. की आणखी काही...
दि. १७ जानेवारी २०१६

No comments:
Post a Comment